बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

पुणे | कोरोनाचा नवा व्हेरींयट ओमीक्रॉनच्या (Omricon) पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारीच चित्रपटगृहे, नाट्यगृहे 100 टक्के क्षमतेने सुरु राहणार, अशी घोषणा केली होती. मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांना 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यावरून महापौरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

महापौरांनी महाविकास आघाडीतील विसंवादाचा पुढचा टप्पा!, असं म्हणत महाविकास आघाडीला हिणवलं आहे. ते ट्विटमध्ये म्हटले आहेत, एकीकडे प्राथमिक शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय कायम ठेवायचा आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा. हा विसंवाद अधोरेखीत करण्यासारखा आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये राज्य सरकारने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांना घातलेल्या निर्बंधावरून सुनावलं आहे. ते म्हणाले, कलावंत, निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना राज्य सरकारने उत्तर द्यायलाच हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे. ओमीक्रॉन व्हेरीएंटमुळे पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. यामुळे राज्य सरकारने निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

10 वर्षांच्या प्रवासात पटकावला ट्विटरच्या CEOपदाचा मान! पराग अग्रवाल नेमके आहेत तरी कोण ?

चहाप्रेमींनो सावधान! चहाच्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

तीन बायका फजिती ऐका! बायकांच्या हट्टापाई नवऱ्याने केलं असं काही की…

नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली, प्रवासासह इतरही गोष्टींवर आली बंधनं

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ होताच कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More