पुणे महाराष्ट्र

‘घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन घरच्या घरी करा’; महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुणेकरांना आवाहन

पुणे | घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केलं आहे. पुण्यात दरवर्षी पाच लाख मूर्तींचे विसर्जन हौदात होतं.

घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार. सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा यावर्षी सेवक व्यस्ततेमुळे मनपाकडून केली जाणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्याही लक्षात घेता महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशमूर्तीची खरेदी मंडळांनी आणि नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावी. यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या जाणार नसल्याची माहिती आहे.

उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळणार नाही, असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा

“मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय, तिथं देवी जागृत आहे”; मराठी दिग्दर्शकाच्या वक्तव्यानं खळबळ

भारतात लॉकडाऊनच्या काळात ‘या’ देशी डेटिंग अ‌ॅपने डाउनलोडिंगमध्ये ओलांडला 1 कोटींचा आकडा

लॉकडाऊनच्या काळात भारतात लोकांनी गुगलवर जास्त प्रमाणात केलं ‘हे’ सर्च…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या