पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
पुणे | पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांचा मध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. तिसऱ्या लाटेची तयारी तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता सरसकट अनलॉक करू नये, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री अजित पवारांसमोर ही भूमिका मांडणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपण लॉकडाऊन त्यातून पुन्हा अनलॉक आणि पुन्हा लॉकडाऊन मध्ये कसे गेलो हे अनुभवले आहे.त्यातून हे लक्षात आले आहे की तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. टप्प्या टप्प्याने हा अनलॉक केला गेला पाहिजे, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुणे शहरात कोरोना आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आज अखेर शासनाकडून येणार्या प्रत्येक नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”
अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, गाड्यांची तोडफोड; पाहा व्हिडीओ
कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!
कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे
‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल
Comments are closed.