बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘हा’ गंभीर मुद्दा गेला थेट नितीन गडकरींच्या दरबारी; महापौर भेटीसाठी जाणार दिल्लीला

पुणे | पुण्यातील नवले ब्रिज येथे मागील काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरूच आहे. 22 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारीच नवले ब्रिजवर टँकर आणि ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये तिघांचा मृत्यूदेखील झाला होता. दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढतच असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आता या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे.

नवले ब्रिजवरील अपघातांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असल्याने यावर आळा बसण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता यासंदर्भात लवकरच महापौर दिल्लीला जाणार असून गडकरींची भेट घेणार आहेत. नवले ब्रिजवर अपघातामध्ये 2014 पासून तब्बल 56 जणांनी प्राण गमावले आहेत.

या वर्षात नवले ब्रिजवर एकूण छोटे मोठे असे 42 अपघात झालेले आहेत. या अपघातामध्ये 22 लोकांनी आपले प्राण गमावले असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर नवले ब्रिजवर या वर्षात 16 गंभीर अपघात झालेले आहेत. ज्यामध्ये 18 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

कात्रज नवीन बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत खूप मोठा उतार आहे. उतारामुळे वाहनांचा वेग अचानक खुप वाढतो. हा वेग वाढल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटतं आणि ब्रिजवर गंभीर अपघात घडतात. परंतु या अपघातात अनेकांनी प्राण गमावला असल्याने आता या समस्येवर लवकरच मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही; मालकही बदलतील, नाड्याही सुटतील!”

“लसीकरण होऊनही तुमच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पसरतोय”

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आली बाजारात, ‘हे’ आहेत भन्नाट फिचर्स

….म्हणून शिक्षक उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More