बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे | पुण्यात गेल्या काही दिवसांपासूून कोरोनाने थैमान घातलं होतं. पण आता पुण्यात कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत असल्याचं दिसत आहे. कोरोना काळात आयआयटी इंजिनियर्सने अनेक शोध लावत कोरोना रोखण्यासाठी विविध उपकरणे तयार केली होती. त्याचं सर्वत्र कौतूक देखील झालं होतं. आता पुण्यातल्या एका 15 वर्षाच्या मुलाने कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी एक वेगळा प्रयोग केला आहे.

पुण्यातील दस्तूर शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विराज राहुल शहा या 15 वर्षीय विद्यार्थ्यांने कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट तयार केली आहे. यासाठी विराज शहाने रितसर प्रशिक्षण घेऊन कोरोनाविषयीची सर्व माहिती जमा करुन ती एका वेबसाईटच्या रुपानं समोर आणली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विराज शहाच्या वेबसाईटचं उद्घाटनही पार पडलं.’जीवन रक्षा डाॅट काॅम’ असं या वेबसाईटचं नाव आहे. त्यामध्ये कोरोनापासून कोणती काळजी घ्यायची याची पुर्ण माहिती दिली आहे, त्याचबरोबर, लसीकरणापासून ते ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांपर्यंत कुठे काय उपलब्ध आहे? या संदर्भात सर्व माहिती यात उपलब्ध आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विराज शहाला शाबासकीची थाप दिली आहे.

दरम्यान, प्लाझ्मा दानविषयी माहिती देणाऱ्या लाईफ डोनेशन पोर्टलचीही निर्मिती विराज शहाने यात केली आहे. या वेब पोर्टलच्या साहाय्याने लोकांना रक्तदान, प्लाझ्मा दानविषयी सामान्य लोकांना माहिती मिळत आहे. लोकांना गरज असताना विराज शहानं केलेल्या कामाचं कौतूक करायला हवं.

थोडक्यात बातम्या-

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 92 टक्यांवर

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

दूरदृष्टी! कोविडकाळात व्हायरल होतोय अटल बिहारी वाजपेयींचा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More