मुंबई | मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, पण मुंबईत कुठंच पाणी तुंबलेलं नाही, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
तसंच पालिकेनं चांगलं काम केल्यामुळे मुंबईत पाणी साचलं आहे पण कुठं तुंबलेलं नाही, फक्त सखल भागात पाणी साचलेलं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मात्र, पाणी तुंबल्यामुळेे अनेक मतदार शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत, यावरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या नागपुरात दडपून टाकू नका!
-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!
-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी
-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!
-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???
Comments are closed.