बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

मुंबई | मयुर शेळके याने अवघ्या काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. यानंतर रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचं खूप कौतुक केलं.

मयुर शेळकेला रेल्वेकडून पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र यापूर्वी त्याने घेतलेल्या निर्णयाने मयुरने पुन्हा एकदा सर्वांची मन जिंकली आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे.

संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार आहे. वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेने पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

दरम्यान, वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले.

थोडक्यात बातम्या- 

‘हे केंद्र सरकारचं काम नाही, जबाबदारी राज्यावर सोपवावी’; राज ठाकरेंचं मोदींना दुसरं पत्र

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

महाराष्ट्राला 20 कोटी लस मिळणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा

‘या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’; उच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला फटकारलं

मेकअप खराब होईल म्हणून मास्क न लावणं नवरीला पडलं चांगलंच महागात!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More