एमसी स्टॅनबाबत धक्कादायक बातमी समोर, ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ

MC Stan | बिग बॉस शो जिंकल्यापासून रॅपर एमसी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मधल्या काळात एमसीच्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा होती. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे.

एमसी स्टॅन गायब

रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे. एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एमसी स्टॅन (MC Stan) गायब झाल्याची चर्चा सुरु आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक शहरामध्ये अनेक भागांमध्ये एमसी स्टॅन हा गायब झाल्याचे पोस्टर लावण्यात आलंय. यामुळेच मोठी खळबळ निर्माण झाल्याच बघायला मिळतंय.

एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्टर जागोजागी लागले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल फोटोमध्ये एमसी स्टॅनच्या फोटोसोबत मिसिंग असं लिहिल्याचं दिसत आहे.

MC Stan | ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ

एमसी स्टॅन हा मुंबईतून गायब झाल्याचेही सांगितले जातंय. मात्र, याबद्दल अजून एमसी स्टॅनच्या कुटुंबाकडून काहीच खुलासा हा करण्यात आला नाहीये. मात्र, चाहते हैराण झाले. सोशल मीडियावर एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

ही बातमी समोर आल्यानंतर आणि बेपत्ता पोस्टर्स पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून तो गेला कुठे? शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरकाही लोकांचं म्हणणं आहे की, हा एक मोठा पीआर स्टंट आहे. अनेकांनी म्हटले की, त्याचे एखादे गाणे वगैरे लॉन्च होणार असावे बहुतेक त्यासाठी हे सुरू आहे.

दरम्यान, ‘बस्ती का हस्ती’ आणि ‘तडीपार’ सारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एमसी स्टॅनने भारतीय हिप-हॉपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?

‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो

‘…तर मी सरकारमधून बाहेर पडेन’; ‘या’ बड्या नेत्याची धमकी

शरद पवारांनी सांगितली रणनीती, उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा