Walmik Karad | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. (Walmik Karad)
एसआयटीने हा मोक्का लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे कराडवर मोक्का लावण्यात आला नाही.
वाल्मिक कराडवर मोक्का का नाही?
वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड असून त्याच्यावर तसा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.मात्र, कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही.तर, इतर सर्व आरोपींवर आता मोक्का कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. “माझ्या वडिलांची हत्या होऊन आता महिना उलटला आहे. या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत, परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही. या प्रकरणात तपास कुठवर आलाय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवं”, अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.
धाराशीवमध्ये आज आक्रोश मोर्चा
तर, आज (11 जानेवारी)धाराशीवमध्ये सरपंच हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
News Title : MCOCA not imposed on Walmik Karad
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती
मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…
तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं
जबरदस्ती घर नावावर केलं, रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून…; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप
महाविकास आघाडीत फुट? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा