Top News देश

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

नवी दिल्ली | मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज दु:खद निधन झालं आहे. धर्मपाल गुलाटी यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे.  गुलाटी यांच्यावर मागील तीन आठवड्यांपासून दिल्लीतील रुग्णालयात उपाचर सुरु होते.

उपचारादरम्यान गुलाटी यांना आज पहाटेच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टचा झटका आला. त्यातच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास सोडला. आयआयएफएल हुरून इंडिया रिच 2020 च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती होते.

धर्मपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा होता. एमडीएचहा मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रॅन्डपैकी एक आहे. तसंच त्यांच्या कंपनीत 50 निरनिराळ्या मसाल्यांचं उत्पादन केलं जातं. एमडीएचचं आज केवळ भारतातच नाही तर दुबई आणि लंडनमध्येही कार्यालयं आहेत.

दरम्यान, गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प

…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला

“अमेरिका जगाला एकत्रही ठेवू शकला नाही, जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम”

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या