बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंदी भाषेमुळे संसदेतल्या चर्चांची पातळी खालावली”

नवी दिल्ली | तमिळनाडूतील मरुमलारची द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार वायको यांनी केलेल्या विधानामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतल्या चर्चांचा स्तर खालावला आहे. संसद सदस्य हिंदीत केवळ आरडाओरडी करतात. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदीही हिंदीतच भाषण करतात, असं वायको एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

हिंदीत कोणतं साहित्य उपलब्ध आहे. तीची काही पाळंमुळंच नाहीत. संस्कृत एक मृत भाषा आहे असंही वायको म्हणालेत.

दरम्यान, नेहरू हे एक महान लोकशाहीवादी नेते होते. ते क्वचितच संसदेच्या सत्रात गैरहजर रहायचे. मात्र मोदी कधीतरी संसदेच्या सत्रात नोंदवतात, असंही वायको म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत, हीच कार्यकर्त्यांची इच्छा”

-…म्हणून काँग्रेस अध्यक्ष निश्चित व्हायला वेळ लागतोय!

-विधानसभेला आम्ही ‘यांच्यासोबत’ जाऊ- बच्चू कडू

-…तरच आम्ही येत्या विधानसभेला काँग्रेससोबत जाणार- प्रकाश आंबेडकर

-“एक अध्यक्ष ठेवा किंवा पाच… काँग्रेसचं बंद पडलेलं इंजिन सुरू होणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More