#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

मुंबई | #MeToo च्या वादळामुळे बॉलिवूडमध्ये सगळेच सावध झाले आहेत. त्यातच सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मीनं सावध होत काही पाउलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 

निर्माता कंपन्यांसोबत करार करताना इतर नियमांसोबत लैंगिक शोषणाला आळा घालणाऱ्या नियमांचा करारात समावेश करण्याचं मी ठरवलं आहे. सध्या यावर वकिलांशी चर्चा सुरू असल्याचं इम्राननं सांगितलं आहे. 

अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या कंत्राटात हे नियम असतात. परंतू आतापर्यंत एकाही चित्रपट निर्माती कंपनीने याची अंमलबजावणी केलेली नाही. मी टू मोहिमेमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता ही नियमावली करणं काळाची गरज असल्याचं इम्राने सांगितलं.

दरम्यान,  किमान माझ्या कंपनीत पुरुष, महिला कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या हिताच्या दृष्टीनं हे नियम असतील, असंही त्यानं म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे!

-विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको!”

-कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही- मुख्यमंत्री

-राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

-#MeToo | पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात; भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य!

Google+ Linkedin