बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने तिकीट नाकारलेल्या मेधा कुलकर्णी यांचा मोठा गौप्यस्फोट!

पुणे |  कोथरूड विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारलेल्या भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला फोन करून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट कुलकर्णी यांनी केला आहे.

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून भाजपने चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून मैदानात उतरवलं आहे. याचप्रकरणी त्या चांगल्याच नाराज होत्या. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश देखील मिळालं.

राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी फोन केला होता. कोथरूड मधून लढण्याची त्यांनी ऑफर दिली होती. आपण नम्रपणे ही ऑफर नाकारली. मी पक्षासोबतच राहणार असून चंद्रकांत पाटील यांना मोठया मताधिक्याने निवडून आणणार, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी मनसेची ऑफर नाकारल्यानंतर मनसेने आज किशोर शिंदे यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More