पुणे | भाजपच्या पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्याने नाराज झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं. आधी विधानसभा आता विधानपरिषदेला डावललं, माझं नेमकं काय चुकलं? हे पक्षाने सांगाव, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. दादांनी प्राॅमिस मोडलं, माझं नेमकं काय चुकलं हे पक्षाने सांगावं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले.
मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मला तिकीट दिलं नव्हतं. मी पडलेली नव्हते, तर आश्वासन देऊन मला थांबवलं होतं. मी पक्षाची पंचवीस वर्षापासून कार्यकर्ती आहे. पक्ष कुठेच नसताना मी निष्ठेनं काम केलेला आहे. वेगवेगळी प्रलोभने आली असतानाही मी पक्ष सोडला नाही. अत्यंत कठीण, वाईट परिस्थितीत पक्षाला मी विजय मिळवून दिला आहे, असंही मेधा कुलकर्णा यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील
पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा
महत्वाच्या बातम्या-
‘यंदा फीवाढ करु नका’; मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश
लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा
“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”
Comments are closed.