मुंबई | कृषी कायद्यावर कोणत्याही प्रकारची चर्चाच होऊ शकत नाही. हा कायदाच मागे घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली आहे.
जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत शेतकरी दिल्लीतून हलणार नाहीत, असा इशाराही मेधा पाटकर यांनी दिला आहे. त्या ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत तळ ठोकून आहे. त्यांची दखल सरकारला घ्यावीच लागणार आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही बळीराजाच्या आंदोलनात सामिल झाला आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्या.
दरम्यान, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर तो खऱ्या अर्थाने डिसले गुरुजींचा सत्कार ठरला असता”
“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार
शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वत:ला दिली तानाजीची उपमा; म्हणाले…
“प्राण जाये पर वचन न जाये, अशी शिवसेना आहे”
Comments are closed.