खेळ

‘तैमूरला सोडा, सुशांतची माहिती द्या’; ‘हा’ क्रिकेटपटू संतापला

नवी दिल्ली | 14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हळहळला. यादरम्यान सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीवर टीका केली. तर एका भारतीय क्रिकेटरने प्रसारमाध्यमांवरही टीका केलीये.

भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारी यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रसारमाध्यमांवर निशाणा साधलाय. याविषयी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

प्रसारमाध्यमांद्वारे जेवढ्या तैमूरच्या बातम्या दिल्या जातात त्यातून पत्रकारांनी जागं व्हावं आणि सुशांत सिंग राजपूतबद्दलच्या बातम्या दाखवाव्या. सुशांतच्या आत्महत्येनंतर कोणीही प्राईम टाईमला चर्चासत्रंही आयोजित केलं नाही. सध्या संपूर्ण देशाला सुशांतच्या प्रकरणाबद्दल जाणून घ्यायचं आहे, असं मनोजने म्हटलंय.

सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूमधील घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला. यावरून अनेक स्टारकिड्सना ट्रोलही करण्यात आलं.

ट्रेंडिंग बातम्या-

सुट्टी संपल्यावर शिक्षकांनी वर्गखोल्या उघडल्या; अन समोर आला धक्कादायक प्रकार…!

“संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या, सकाळी विका आणि आत्मनिर्भर व्हा”

महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा

कोरोनावर इंजेक्शन निघालंय पण…; पाहा शरद पवार काय म्हणाले

भविष्यात मुंबई, पुण्यातील गर्दी कमी करणं आवश्यक- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या