हिटलरशाही!!! माध्यमांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी!

डेहराडून | माध्यमांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतलाय. भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी याप्रकरणी 3 पानी आदेश जारी केलाय. 

उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पलकुमार सिंग यांनी माध्यमांना सरकारी कार्यालयात प्रवेश करण्यास बंदी घातलीय. आम्हाला गरज पडली तर माध्यमांना बोलवू तेही रिशेप्शनपर्यंत आणि तिथंच अधिकारी माध्यमांना माहिती देतील, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. 

दरम्यान, भाजप सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठलीय. मात्र सरकारी माहिती गोपनीय राहावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं उत्पलकुमार सिंग यांनी सांगितलंय.