Top News महाराष्ट्र मुंबई

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी!

मुंबई | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे असे अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

15 जुलैपासून  वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा  घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास  याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित केले जाईल अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

महत्वाच्या बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; भेटीनंतर परीक्षांबाबत केला मोठा निर्णय जाहीर

‘मुंबई सोडून जायचं नव्हतं पण…’; सनीने सांगितलं अमेरिकेला जाण्यामागचं खरं कारण

राज्यात आज 2933 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या