बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे!

मुंबई | मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एकत्र करून आरक्षणासाठी लढा पुकारला आहे. मराठा क्रांती मूक आंदोलनाची सुरुवात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या या आंदोलनातील गर्दी पाहता मराठा आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकार बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. मराठा आरक्षणविषयी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक आणि ठाकरे सरकारमधील काही मंत्री देखील उपस्थित असतील. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.

मराठा क्रांती मुक आंदोलनात सतेज पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांनी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री व इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी आपण उद्याच मुंबईला या असं आमंत्रण संभाजीराजेंना दिलं होतं. सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे आणि या संयमाला राज्यशासन म्हणून आम्ही चर्चेची साथ देऊ आणि राज्य सरकार यासंबंधी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो असं सतेज पाटील म्हणाले होते.

दरम्यान, गेल्या 6 वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य धारेत राहिलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण असं पहिल्या टप्प्यात आंदोलन केलं जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More