बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज सह्याद्रीवर बैठक पार पडणार, ठाकरे सरकार घेणार महत्वाचे निर्णय!

मुंबई | गेले वर्ष-दोन वर्ष आपण कोरोना या महामारीशी लढा देत आहोत. यातच आता पूरस्थितीमुळे अनेकांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज दुपारी साडेबारा वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात येणार याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यातच या बैठकीत पूरग्रस्तांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासन प्रत्येकाला मदत करेल. आता पूर ओरसत आहे, त्यामुळे आता काम गतीने पूर्ण करुन पुरग्रस्तांना न्याय दिला जाईल. पुरामुळे बाधित झालेला कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.

दरम्यान, या मुसळधार पावसातील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकंही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”

खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; वाचा आजचे ताजे दर

“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”

भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More