बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्य विभागात मेगा भरती; 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी

मुंबई | कोरोनाने आरोग्य विभागाच्या त्रुटी समोर आल्या होत्या. आरोग्य विभागाकडे सरकारने लक्ष न दिल्यानं कोरोनाच्या पहिल्या लाटेचा गंभीर सामना करावा लागला होता. त्यावेळी तातडीच्या सोईसुविधा आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आला होत्या. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती.

आता त्यामधील 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा आणि 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन दोन हजार अशी एकूण चार हजार पदं भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.  राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागानं ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी, अशी मागणी केली होती. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता केवळ 50%  भरती घेण्यास परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचारक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागावरील ताण कमी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More