बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

नवी दिल्ली | भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचं दिल्लीत वितरण पार पडलं आहे. भारतीय सिनेमातील आजीवन योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत यांना देण्यात आला आहे. यासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मनोज वाजपेयी आणि साऊथचा स्टार धनूष यांना देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटातील भूमिकेसाठी कंगणा राणावतला देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिवगंत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या छिछोरे चित्रपटला मिळाला आहे. आज देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी –

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (पंगा, मणिकर्णिका)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र  रान पेटलं

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी नर्गिस दत्त

बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार – ताजमाल

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ

सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तूरी

सर्वोत्कृष्ट छायांकन – जल्लीकट्टू (मल्याळम) आ

थो़डक्यात बातम्या 

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More