मुंबई | बिग बाॅस विजेती मेघा धाडेने अभिनेता महेश मांजरेकर यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त पार्टी ठेवली होती. त्यात बिग बाॅसच्या घरातील मेघाचे खास मित्र अभिनेत्री सई लोकूर आणि पुष्कर जोग गैरहजर होते.
मेघानं दोघांना या पार्टीचं आमंत्रण दिलं होतं मात्र या दोघांनी या पार्टीत न येण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. बिग बाॅसच्या घरात या तिघांमध्ये भांडण झालं होतं. बिग बॉस संपल्यानंतरही मेघा, सई आणि पुष्कर यांच्यात राग कायम असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, या पार्टीत मेघाचे बिग बाॅसच्या घरातील अस्ताद काळे, उशा नाडकर्णी, स्मिता गोंदकर, सुशांत शेलार, भुषण कडू यासह इतर कलाकार सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?
-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!
-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!
-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!
-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!
Comments are closed.