बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुत्री जरी मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो पण…”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. येत्या काही दिवसात या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होईल पण यावर अजूनही काही तोडगा निघाला नाही. मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत.

मोदी सरकारला त्यांच्या वेगवेगळ्या धोरणावरून घेरणाऱ्या सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. कुत्री मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो. मात्र शेतकरी आंदोलनात 600 शेतकरी शहीद झाले तरी दिल्लीचे नेते लोकसभेत 600 शेतकऱ्यांचा प्रस्ताव मंजूर करू शकले नाहीत, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक गेल्या अनेक दिवसांपासून मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. भ्रष्टाचाराचा मुद्दा, कश्मीरमधे झालेल्या हिंसाचाराचारावरून मोदी सरकारला लक्ष्य केल्यानंतर राज्यपाल मलिक यांनी आता शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं कारण देशात एवढे मोठे आंदोलन आत्तापर्यंत कधी झालं नाही. आंदोलनात 600 लोक शहीद झाले. कुत्री मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश जातो पण 600 शेतकऱ्यांचा प्रस्ताव हे लोकसभेत मंजूर करू शकले नाहीत, अशी खोचक टीका राज्यपाल मलिक यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान झाल्यावर मी सर्वात पहिले ‘हे’ काम करणार- राहुल गांधी

अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत सरकारवर भडकले, म्हणतात….

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही मागे टाकलं

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More