बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 19 नोव्हेंबरला तीन वादग्रस्त  कृषी कायदे (Agricultural laws) मागे  घेत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो, त्यामुळे आम्ही देशवासीयांची माफी मागत आहोत , असं नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं. यावरून आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Meghalaya Governor Satyapal Malik) यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच केंद्र सरकारने सांगितल्यास राजीनामा देतो, अशी भूमिका सत्यपाल मलिक यांनी घेतली आहे.

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी हमी भावाला (Guaranteed price) कायदेशीर आधार देण्याची मागणी करत आहेत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यातच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी मान्य करत आपापल्या घरी जावं, असं म्हटलं आहे. मलिक यांनी अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या हमी भावाला पाठिंबा दर्शवत आपल्याच केंद्र सरकारची कोंडी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारच्या धोरणावर उघडपणे टीका करत आहेत. याअगोदर मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं होतं. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले होते. घटनात्मक पदावर असूनही मलिक केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

दरम्यान, याबाबत विचारले असता माझ्या राजीनाम्याचा प्रश्न आलाचं तर, मला नियुक्त करणाऱ्या सरकारने आज सांगितल्यास, आजच्या आज मी लगेच राजीनामा देईल, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावाच्या पलिकडे ताणू नये असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. पुढील वर्षात उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. या घटनेतचा मोठा परिणाम उत्तरप्रदेश निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

आणीबाणी जाहीर! ‘या’ शहरात कोरोनाने माजवला हाहाकार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने राज्यात खळबळ; बीएमसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! अहमदनगर येथे एसटी बसेसवर दगडफेक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More