Top News

बरं झालं गेले… आम्हाला युवकांना संधी देता येईल- मेहबूब शेख

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष सचिन अहिर यांनी मनगटावरचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधलं. यावरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

ज्यांनी कधी पक्षाच्या हिताची कामं केली नाहीत… ज्यांचा स्वत:वर विश्वास नाही… जे सत्तेचे लालची आहेत.. त्यांचा पक्षाला काय फायदा??? बरं झालं गेले… आम्हाला पक्षात युवकांना संधी देता येईल, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली आहे. ते ‘थोडक्यात’शी बोलत होते.

ज्या पानाची ईमानाची देठं सरकली आहेत तीच पाने हवेसोबत उडून जातात… ज्यांच्या देठात ईमानाची ताकद आहे, ती पाने हवेत काय तुफानात देखील झाडाला डोलावत ठेवतात, अशा शब्दात मेहबूब यांनी अहिरांवर बोचरा वार केला आहे.

ज्यांचे हात दगडाखाली गुंतलेत ते कार्यकर्ते पक्ष सोडून चाललेत. नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडतील तिथे राष्ट्रवादी युवक आणखी 5 पटीने जोरात काम करेल. वर्षांनुवर्षे ज्या नेत्यांनी जागा आटवली आणि ते आता सोडून जातायेत त्यांचं स्वागत…  जे निवडूनच आले नाहीत त्यांच्या जाण्याने आम्हाला धक्का कसला?? असं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ज्याच्या ईमानाची देठं मजबूत आहेत, अशा लोकांची टीम करायला खंबीर आहे… चाललेल्या नेत्यांनी काळजी न करता जावं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

-पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या