बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट

बीड |  चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले जवान शहीद होत आहेत परंतु केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी लहानसहान गोष्टीवर ट्वीट करत असतात मात्र चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली.

भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर देखील मोदींनी यासंदर्भात ठोस पावलेही उचललेली नाही, असा आरोप करत आता मोदींनी चीनला ‘लाल डोळे’ दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना ‘लाल डोळे’ दाखवा पुर्ण देश तुमच्या सोबत आहे, असं शेख म्हणाले.

दरम्यान, चीनच्या हल्ल्यानंतर कोणतीच भूमिका न घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या वस्तूमधील ‘खुळखुळा’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भेट म्हणुन पाठवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

महत्वाच्या बातम्या-

चिंता वाढली… पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

राज्यात आज ३७५२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती…

प्रभू रामचंद्रांचा चीनी ड्रॅगनवर निशाणा; ‘या’ देशातील वेबसाईटवर झळकला फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More