औरंगाबाद | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केला आहे.
औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!
…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!
डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर
भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही- शरद पवार