बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राने कोल्हापूर पूरस्थितीवेळी पाहिलंय… आता फडणवीस अजिबात नको”

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार या विषाणूसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अशा परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक राजकारण करत आहेत. अशाच राजकारण करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चांगलंच सुनावलं आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूर पूरस्थितीवेळी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे, असा चिमटा काढत देवेंद्र फडणवीस आणि राजकारण करणाऱ्या भाजप समर्थकांनी कोरोनातून बाहेर येऊन विचार करा म्हणजे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री कश्या प्रकारे काम करत आहेत हे आपल्याला दिसेल, असं त्यांनी म्हटलं आहे. ते थोडक्यातशी बोलत होते.

ही वेळ राजकारण करण्याची नाही तर विरोधकांनीदेखील सत्ताधाऱ्यांना सूचना करत तसंच सहकार्य करत जनतेच्या भल्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आहे. मात्र प्रत्येक गोष्टीत भाजपवाल्यांना राजकारणच सुचतं, असं म्हणत शरद पवारांनी किल्लारी भूकंपावेळी सगळ्या देशाला आपत्ती व्यवस्थापनाचा धडा घालून दिला आणि सध्या त्यांच्या विचारांची लोकं आता सत्तेत आहेत, अशी आठवण त्यांनी भाजपा करून दिली आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नाही. कोरोनाविरोधातील लढाई देवेंद्र फडणवीस यांनी अधिक सक्षमपणे हाताळली असती, असं भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या टीकेला मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

भारतात कोरोना व्हायरसनं घेतला चौथा बळी!

कोरोनामुळं शेतकरी अडचणीत; तोडणीला आलेली लिंब फेकून देण्याची आली वेळ

“फडणवीसांना एवढाच जर अनुभव असेल तर त्यांना वुहानला पाठवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More