मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख य़ांनी पत्रकार परिषद घेतलीये. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलंय.
बलात्काराच्या आरोपांचं खंडन करताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू कोसळलं. यावेळी त्यांनी सत्य समोर येण्यासाठी आपण नार्को टेस्टही करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
मेहबूब शेख म्हणाले, “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. त्या महिलेच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. काहीही केलं नसताना केवळ राजकीय द्वेषातून असं घडू लागलं तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. 9 ते 11 डिसेंबर यामध्ये मी मुंबईत होतो. जर मी दोषी असेन तर माझ्यावर कारवाई करावी.”
थोडक्यात बातम्या-
भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही- शरद पवार
मोठी बातमी! आयटी रिर्टन’बाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता फक्त ‘इतक्या’ वेळाच देता येणार MPSC परीक्षा, जाणून घ्या!
ईडीचं ऑफिस मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडू यांनी टीका
‘सीबीआय’नंतर राज्यात ‘ईडी’लाही ‘नो एंट्री’???; गृहमंत्र्याचं सूचक वक्तव्य