देश

…त्यावेळी तोंड का उघडलं नाही?, मेहबुबा मुफ्तींचा अमित शहांवर पलटवार

नवी दिल्ली | जम्मू आणि लडाखमध्ये गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात, जर भेदभाव केला जात होता, तर त्यावेळी तोंड का उघडलं नाहीत?, असं म्हणत जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप अध्यक्ष अमित शहावर पलटवार केला आहे.

गेल्या तीन वर्षात भाजपचा एकही मंत्री का बोलू शकला नाही?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर भाजपविरोधात आरोप केले आहे.

दरम्यान, जम्मू आणि लडाख विभागामध्ये मोहबुबा मुफ्ती भेदभाव करत आहे, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर सभेत केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या–

-महेश मांजरेकरांची आगपाखड; या स्पर्धकांना सुनावले खडे बोल!

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या