“संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन; आम्हाला मात्र प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलंय”

श्रीनगर | काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने एक ऑडिओ मेसेज रिलीज केला आहे. यामध्ये आपल्याला ताब्यात घेण्यात आलं असून घरात बंदिस्त ठेवण्यात आलं असल्याची माहिती तिने दिली आहे.
संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. आम्हाला मुलभूत मानवाधिकांरांपासून वंचित ठेवण्यात आलं आहे, असं इल्तिजा जावेदने म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमधील निर्बंध अद्याप शिथील करण्यात आलेले नसून अनेक पक्षांचे नेते अजूनही अटकेत आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचंही इल्तिजा जावेदने म्हटलं आहे. इल्तिजाने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितलं असल्याची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय”
-संकट खूप मोठं आहे… शर्मिला ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले
-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन
-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण