नवी दिल्ली | महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यायागर राव यांच्या वक्तव्याचा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी समाचार घेतला आहे. मुफ्ती यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी आहे, असं उपहासात्मक ट्विट करुन त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटना आहे, असं वक्तव्य राव यांनी केलं होतं.
दिवंगत सरसंघचालक गोळवळकर गुरुजींच्या नावावर रामटेक येथे शैक्षणिक संकुल सुरु करण्यात येत आहे. यावेळी राव यांनी हे वक्तव्य केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?
-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”
-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’
–नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन
-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश