बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली | मेहूल चोक्सी अँटिग्वाला फरार होण्याआधी 4 जानेवारी 2018 ला पंजाब नॅशनल बँकेसोबत त्यानं 13,578 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2013 मध्ये तो शेअर बाजाराच्या घोटाळ्यातही सामील होता असं सांगितलं जातं. 2017 मध्ये चोक्सीनं अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व घेतलं. यानंतर काही महिन्यांतच हा घोटाळा समोर आला होता.

पीएनबी घोटाळा या प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी गायब झाला आहे. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, आरोपी कुठेतरी गायब झाला आहे. यानंतर अँटिग्वापोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. मंगळवारी अँटिग्वाच्या स्थानिक रिपोर्टमध्येही चोक्सी बेपत्ता झाल्याचं सांगितलं गेलं आहे. स्थानिक अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की चोक्सी सोमवारी रात्री एका प्रसिद्ध  हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी घराबाहेर पडला आणि त्यानंतर पुन्हा दिसलाच नाही.

अँटिग्वान्यूजरूम डाॅटकॉमच्या अहवालात असं म्हटलं गेलं आहे, की मेहूल या हिरा व्यापाऱ्याची गाडी संध्याकाळी जॉली हार्बर येथे आढळली. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, चोक्सीचे वकील अग्रवाल म्हणाले की, मेहुल चोक्सी गायब आहे. तेव्हापासून आमच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून चोक्सीच्या घरचे सदस्य सध्या चिंताग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात अँटिग्वा आणि बारबुडानं चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, चोक्सीनं सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. अर्थमंत्री निरमला सीतारामण यांनी मार्च महिन्यात असा दावा केला होता, की फरार विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतात माघारी येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

देशात कोरोना मृतांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा ओलांडला; नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं”, महिलेचा विनयभंग करुन मारहाण

चार टप्प्यात राज्यातील लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

“लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More