बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास पुरूषांनीही अनुभवला, अक्षरशः लोळताना दिसले, पाहा व्हिडीओ

मुंबई | प्रत्येक महिलेच्या आयुष्यात मासिक पाळी ही खूप महत्त्वाची असते. ज्यावेळी त्यांना मासिक पाळी आलेली असते त्यावेळी त्यांना होणाऱ्या वेदना त्या स्त्रीलाच माहित असतात. महिलांना कमजोर म्हटलं जातं परंतू मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना किती असह्य असतात याची आपण कल्पना करू शकत नाही.

मासिक पाळीवेळी महिलांना किती वेदना होतात याचा अनुभव देणाऱ्या कृत्रिम यंत्राबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर असं या यंत्राचं नाव आहे. व्हिडीओमध्ये काही मुलं-मुली दिसत आहेत त्यामध्ये ते एकमेकांना ते यंत्र लावून त्याचा अनुभव देत असल्याचं दिसत आहे. यामध्ये मुली आणि मुलांना वेगवेगळे अनुभव आलेले दिसत आहेत. त्यामध्ये मुलगा पहिल्यांदा अनुभव घेत आहे तो त्या वेदनेवेळी खाली पडतो. त्याला त्या वेदन सहनच होत नाहीत.

त्यानंतर मुली त्याचा अनुभव घेतात तेव्हा त्यांना मुलांइतका त्रास होत नसल्याचं दिसून आलं आहे. स्त्रियांची मासिक पाळी किती वेदनादायी असते, याबद्दल जागृती करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. यातून आपल्यालाही समजेल की महिलेला जेव्हा मासिक पाळी असते तेव्हा ती किती वेदना सहन करत आपलं काम करत असते.

दरम्यान, आता प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कंपनी, लष्कर, राजकारण, शिक्षक, डॉक्टर, नर्स इ. क्षेत्रात काम करतात. मात्र अजूनही स्त्रीयांच्या या काळातल्या वेदनांकडे इतरांकडून दुर्लक्ष केलं जातं. अनेक घरांमध्येही महिलेला समजून घेतलं जात नाही.

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ जिल्ह्यात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट करणार!

मन सुन्न करणारी घटना; कोरोनाबाधित पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोनामुळे होणाऱ्या ‘या’ आजारावर होणार मोफत उपचार

‘माझी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा’; व्हिडीओ पोस्ट करत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More