बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरुषांनो तुम्ही तुमची प्रेग्नन्सी टेस्ट केली अन् त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर…

नवी दिल्ली |  गर्भधारणा चाचणी ही तर महिलांसाठी असते मग पुरूषांनो तुम्ही ही चाचणी केली का? या प्रश्नानं गोंधळ उडू शकतो. मात्र, हे खरं आहे की ही चाचणी महिलांइतकीच पुरूषांसाठी आवश्यक आहे. एखादा पुरुष गरोदर आहे, हे तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल. बऱ्याचदा पुरुष बाळाला जन्म देऊ शकतात का याबाबत चर्चा होत असते. मात्र, असं होणं अशक्य असल्यानं ही चर्चा कधीही निष्कर्षाच्या पातळीवर येत नाही. पुरुष गरोदर राहत असो अथवा नसो हा मुद्दा बाजूला राहिला. पण, तरीही पुरुषांनी महिलांप्रमाणे प्रेग्नन्सी टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती नसेल पण जर पुरुषांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली तर त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येतो.

जर एखाद्या पुरुषाची गर्भधारणा चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर त्याचा अर्थ तो पुरुष मूल जन्माला घालणार आहे, अशी शंका मनात येऊ शकते. मात्र, अशी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर हे पुरुषाला होणाऱ्या गंभीर आजाराचं लक्षण आहे. जेंटसाईड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर संबंधित पुरुषाला टेस्टीक्युलर कॅन्सर झाल्याचं लक्षण समजलं जातं.

टेस्टीक्युलर कॅन्सर हा पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरच्या तुलनेत 1 टक्के होणारा कॅन्सर मानला जात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. टेस्टीक्युलर कॅन्सरच्या काही प्रकारांमध्ये एक प्रकारचं हार्मोन प्रवाहित होतं. त्यामुळे एखाद्या पुरुषानं प्रेग्नसी टेस्ट केली आणि या टेस्टमधून संबंधित पुरुषाच्या युरिनमध्ये हे हार्मोन आढळून आलं तर त्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह येणं शक्य आहे. गर्भधारणा चाचणीच्या माध्यमातून टेस्टीक्युलर कॅन्सरच्या काही प्रकारांची तपासणी करणं देखील शक्य आहे. मात्र, याचा अर्थ दर महिन्याला टेस्ट किटच्या स्ट्रिपवर युरिन करणं आवश्यक आहे असा नाही.

दरम्यान, केल्सी सेबोल्ड रूग्णालयाचे यूरोलॉजिस्ट डॉ. फिलीप यांनी सांगितलं की लग्न झालेल्या पुरुषानं जर प्रेग्नसी टेस्टकिटमधील स्ट्रीपवर युरिन केली तर, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र, याचा अर्थ तो मूल जन्माला घालणार असा नसून, तो टेस्टीक्युलर कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे असं स्पष्ट होतं.

थोडक्यात बातम्या –

‘कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली गुड न्यूज

दहावीचा निकाल कधी, कसा लावणार?; अखेर वर्षा गायकवाड यांनी सांगितलं

मोबाइलच्या सततच्या वापरावरून बायकोला टोकणं नवऱ्याला पडलं महागात; घडला धक्कादायक प्रकार

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

आई-वडिलांचा नकार जिव्हारी लागला; 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More