सोलापूर

राहुल गांधींमुळे सलूनवाल्याची उधारी झाली बंंद!

सोलापूर | माढा या शहरातील सलूनवाल्याने उधारी बंद व्हावी यासाठी ‘राहुल अस्त्र’ वापरलं आहे. ‘राहूल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद’, अशी पाटी त्याने त्याच्या दुकानासमोर लावली आहे.

सचिन पाटील असं त्या सलूनच्या मालकाच नाव आहे. पाटील यांनी अशी पाटी लावल्यामुळे लोक कुतुहलापोटी या दुकानात गर्दी करत आहेत. तसेच लोक पाटील यांना दाढी आणि केस कापल्यावर रोख पैसे देत आहेत.

मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा चाहता आहे. ही पाटी लावण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा उद्देश नाही. केवळ दुकानातील उधारी बंद व्हावी यासाठी ही पाटी लावली आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर बाजारातील पैशाचा तुटवडा कमी होईल, बाजारात पुन्हा पैसे फिरायला लागतील, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पोस्टर बॉईज; धोनीच्या कट्टर समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश!

-रोहित शर्मा माझी बायको आहे का, त्याला नेहमी नेहमी बोलायला- शिखर धवन

-…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

-सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप

-…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या