संजय राऊतांकडून ‘अपघाती गृहमंत्री’ म्हणून उल्लेख, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर पाहा काय झालं!
नागपूर | संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर टीका केल्यानंतर अनिल देशमुख यांना त्यावर नागपूर विमानतळावर दोनदा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, दोन्ही वेळी अनिल देशमुखांनी वेगळ्याच मुद्द्यावर बोलत ‘अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले आहेत.’ या राऊतांच्या टीकेवर मौन बाळगणं योग्य समजलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत. अशावेळी इतर कोणताही नवा वाद उद्भवू नये याच विचारातून अनिल देशमुख यांनी इतर कशावरही भाष्य करणं टाळलं आहे. मात्र, ‘माझ्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले होते, त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने या आरोपाची चौकशी न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल.’ अशी महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी इतर कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणं टाळलं आहे.
‘देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे’, अशी टिका संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर केली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं असलं तरीही राजकीय क्षेत्रात चर्चा चालू आहे की, लवकरच गृहमंत्री बदलण्याची शक्यता आहे. अशावेळी अनिल देशमुख यांचं एखादं चुकीचं वक्तव्य त्यांनाच महागात पडू शकतं. त्यामुळे ते सध्या मिडियापासून अंतर ठेऊनच राहत असल्याचं दिसतं आहे.
थोडक्यात बातम्या –
अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांना मोठा इशारा
स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन
2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!
संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…
“25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.