बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मागील वर्षी ऑगस्टमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये त्याने हा तडकाफडकी निर्णय घेतला होता. त्यानंतर अचानक तो आयपीएल न खेळता स्वदेशी परतला होता. त्यानंतर काही काळ सुरेश रैना चर्चेत राहिला. त्यानंतर आता पुन्हा सुरेश रैना एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या TNPLच्या उद्धाटनासाठी सुरेश रैनाला आमंत्रित करण्यात आलं होतं. TNPLचा पहिला सामना सोमवारी खेळवण्यात आला. त्यावेळी या लाईव्ह सामन्याची काॅमेंट्री करण्यासाठी रैनाला बोलवण्यात आलं. त्यावेळी गप्पा मारताना त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. चैन्नईच्या संघात असताना तुला आम्ही लुंगी घालून नाचताना पाहिलंय. तू साऊथइंडियन पद्धत कशी स्विकारली?, असा सवाल सहकाऱ्यांनी त्याला विचारला.

त्यावर उत्तर देताना रैनाने सांगितलं की, मी सुद्धा एक ब्राम्हण आहे. मला इथली संस्कृती आवडते. अनिरुद्ध श्रीकांत, बद्रीनाथ, लक्ष्मीपती बालाजी या खेळाडूंसोबत मी खेळलोय, त्यामुळे मला इथल्या गोष्टी आवडतात. त्यामुळे चेन्नईच्या संस्कृतीवर माझं प्रेम आहे. मला सीएसकेकडून खेळायला आवडतं, आणि आणखी मी खेळत राहिल, असंही रैना म्हणाला आहे.

दरम्यान, काॅमेंट्री करताना जातीचा उल्लेख केल्यानं आता रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर रैनाला ट्रोल देखील केलं जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी रैनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यानं प्रसिद्ध खेळाडू युवराज सिंग देखील वादात सापडला होता. त्यानंतर त्याने जाहीर माफी देखील मागितली होती.

थोडक्यात बातम्या-

“राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात”

“दादा… दोन हाना पण मला आपलं म्हणा, आता माफ करुन अबोला सोडावा”

…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

‘…तर ही वेळ आलीच नसती’; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More