“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी….”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई | बाबरी मशीद पाडताना मी उपस्थित होतो मात्र शिनसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावरुन शिवसेना कमालीची आक्रमक झालेली पहायला मिळाली. अनेकांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.
1857च्या लढ्यातही त्यांचं खूप योगदान आहे, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. याला उत्तर देताना आता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत त्यांना कधी संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांनी कधी संघर्ष केला आहे. त्यामुळे करसेवकांची ते थट्टा उडवू शकतात, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कितीही खिल्ली उडवली तरी तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे. मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
थोडक्यात बातम्या –
“भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला”
“मला दंगल भडकवायची असती तर….”; राज ठाकरे स्पष्टच बोलले…
“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर, मात्र…
‘…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’, राज ठाकरे स्पष्टच बोलले
Comments are closed.