बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात, तासभर चालक गाडीत अडकून, पाहा व्हिडीओ

पुणे | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघाता झाला आहे. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकली. अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर जवळजवळ एक तास गाडीचालक गाडीमध्ये अडकून पडला होता.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर किवळे एक्झिट जवळ हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर किवळेचे स्थानिक पोलीस अधिकारी येथे अपघात झालेल्या ठिकाणी आले.

अपघात झाल्यानर कारमधील तरूण हा गाडीमध्येच होता. जवळपास त्याला तासाभरानंतर सर्वांनी मिळून बाहेर काढलं आणि उपचारासाठी रूग्णालयात पाठवलं.

दरम्यान,  पोलिसांसोबत देवदूत यंत्रणा आणि आयआरबी घटनास्थळी आले. त्यानंतर सर्वांनी मिळून कार चालकाला बाहेर काढलं आणि  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पत्नीच्या चारित्र्यावर पतीला आला संशय अन् घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

जालन्यात डीवायएसपी आणि सात ते आठ पोलिसांचा भाजप पदाधिकाऱ्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी युवकाचा अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! इंटरनेटवर हत्या कशी करायची सर्च करून, दुसऱ्या दिवशी पत्नीचीच केली हत्या

ना परिक्षा ना मुलाखत, महाराष्ट्र पोस्टात नोकरीची संधी; पगारही चांगला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More