
नवी दिल्ली | भारतीय बाॅक्सर मेरी कोमने नवी दिल्लीत खेळवल्या जाणाऱ्या जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने 48 किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मिचा 5-0 ने पराभव केला. या विजयासह तिने आपले 7 वे पदक निश्चित केलं आहे.
मेरीला या विजयामुळे जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत 6 वं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. तिनं आजपर्यंत 5 सुवर्णपदक आणि 1 रौप्यपदक जिंकलं आहे.
जागतिक स्पर्धेत सात वेळेस अंतिम सामन्यात पोहचणारी आणि सर्वाधिक 7 पदकं जिंकणारी ती पहिली महिला बाॅक्सर आहे.
आता अंतिम सामन्यात मेरी कोमचा मुकाबला युक्रेनच्या हॅना आखोटाशी होईल. त्यावेळी तिला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळेल की रौप्यपदक हे निश्चित होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-जिंंकल्यानंतर तुमचं काम केलं नाही तर मला चप्पलने झोडून काढा!
-श्रीपाद छिंदमला मोठा फायदा; विरोधातील भाजप उमेदवाराचा अर्ज बाद
-मध्यरात्री अडीच वाजता अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का
-अयोध्येत शिवसेनेला रोखण्याचं कारस्थान; शिवसेना आक्रमक
-भारताच्या रणरागिणी प्राणपणाने लढल्या; मात्र विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं!