बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई होणार, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

मुंबई | राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून (ST Employee Strike) राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली असली तरी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते. अशातच काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्यास नकार दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. (Transport Minister Anil Parab said that strict action will be taken against the agitating workers)

राज्य सरकारने आंदोलन शेतकऱ्यांविरोधात सौम्य धोरण अवलंबलं होतं. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा विचार करून आता या आंदोलन कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

एसटीची सेवा ही अत्यावश्यक सेवेत आहे. मेस्मा (Mesma) अंतर्गत कारवाई करण्याबाबत आम्ही गंभीर आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा अनिल परब यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही निर्णय घेऊ, हे आम्ही स्पष्ट केलं आहे. आता पगारवाढ करण्यात आली आहे. काहीजण ही पगारवाढ तात्पुरती असल्याची अफवा सातत्याने पसरवत आहेत मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कंगनाला शेवटी माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी अन्…; पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More