बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेसेंजर आणि व्हाॅटसअॅपची सेवा पुन्हा ठप्प; एका महिन्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली | भारतातील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅप काल पुन्हा काही काळासाठी डाऊन झालं होतं. एका महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. फेसबुकने यासंबंधी अधिकृतरित्या माहिती दिली आहे.

अख्खा भारत झोपलेला असताना फेसबुकच्या अंतर्गत येणाऱ्या या तिन्ही सर्विसेस काल काही काळ बंद झाल्या होत्या. डाऊन डिटेक्टर साईटच्या माहितीनुसार काल या सर्विसेस बऱ्याच काळ बंद होत्या. ट्विटर आणि डाऊन डिटेक्टर साईट याबाबतची माहिती समोर येताच याची माहिती सर्वत्र पसरली. आउटेजमुळे हा अडथळा आल्याचं समोर आलं आहे. युझर्सला we are sorry, but something went wrong. please try again असा संदेश दिसत होता.

यावर फेसबुकने ट्विटरवर ट्विट करत याची अधिकृतरित्या माहिती दिली आहे. दिवसाच्या सुरूवातीला काही जणांना फेसबुक वापरण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर आम्ही त्यावर तात्काळ काम केलं आणि समस्या सोडवली आहे, असं फेसबुकने सांगितलं आहे.

दरम्यान, याआधी 19 मार्च रोजी अचानक सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेल्या फेसबुकसह त्याच्याशी संलग्न असलेल्या मेसेंजर आणि व्हाॅटसअॅपची सेवा जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. तिन्ही प्लॅटफाॅर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात फेसबुकला यश आलं होतं.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का!

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

भयानक दृश्यं, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एकाचवेळी 22 कोरोना बाधितांवर अत्यसंस्कार

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More