बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपतींची भेट घेतली पण एकमत नाहीच; मराठा आरक्षणाच्या ‘या’ मुद्द्यावर भाजपचा आक्षेप

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता एका नव्या वळणावर आला आहे. केंद्र सरकारने घटना दुरूस्ती करून राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार तर दिला, मात्र 50 टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. याच मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता एक नवा वाद उभा राहिला आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिलं. परंतु, राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनावर भाजप प्रतिनिधी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सही केली नाही. त्यामुळे आता भाजपने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नवा अडथळा निर्माण केल्याचं पहायला मिळतंय.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणची मर्यादा शिथील करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी केली आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी भाजपचा पुर्ण पाठिंबा आहे. पण, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावर एकमत नाही, असं भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रपतींनी विचारणा केल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नंतर सही केल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. आता 50 टक्के आरक्षणात शिथीलता न आणता मराठा समाजाला आरक्षण मिळणार तरी कसं ?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार?; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

आनंदाची बातमी! राज्याच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“मोदी पंतप्रधान असल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, हे खूप मोठं यश”

“आम्हाला विकत घेण्यासाठी भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची खास पोस्ट व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More