बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढच्या 24 तासात धुवांधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई | पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी मंगळवारी तुरळक गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बुधवारीदेखील या भागांत धुवांधार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

पुण्यात आजपासून गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार यांना ‘हे’ एकमेव काम उरलं आहे- देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, त्यामुळे…- शरद पवार

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही- उद्धव ठाकरे

केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, आम्हाला मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More