बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्यांना हवामान खात्याकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता. त्यात पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या 12 तासात चक्रीवादळाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांत मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी कोकण भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मराठवाड्यामध्ये पावसाने मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे आठ जिल्ह्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवला आहे.

भारतीय हवामान खात्यानं या चक्रीवादळाला ‘विध्वंसक गुलाब’ असं नाव दिलं आहे. सोमवारपासून या वादळाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच ओडिसा राज्याचा दक्षिण भाग आणि आंध्रप्रदेशच्या उत्तरेकडील भागात या वादळाचा जास्त प्रभाव असेल, असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. तर त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. विध्वसंक गुलाब या वादळाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी युनिफाईड कमांड सेंटर म्हणून आपत्ती नियंत्रण कक्ष तयार केला आहे. तसेच नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सुमद्रकिनारी सुरक्षा वाढवली असून पर्यटकांनी काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सुचनासुद्धा केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More