Top News महाराष्ट्र मुंबई

मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे

मुंबई | मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांबरोबर, महाराष्ट्रासाठीही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

रविवारी 20 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या अंधेरी एव-सेव्हन स्थानक, कुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल, चारकोप मेट्रो, डि. एन. नगर मेट्रो येथे भेट दोऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलतं होते.

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

प्रक्लपातील चारकोप मेट्रो डेपोत मेट्रो मार्गावरील चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मेट्रोच्या इंजिनचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच दहिसर येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलाच्या कामाचीही पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

…तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेवटचं आंदोलन करेल- अण्णा हजारे

“…तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल”

“वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे, अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचं???”

“मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार हे ठरलंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या