Top News तंत्रज्ञान देश

हेक्टरनंतर आता नव्या गाडीचा जलवा; एमजी लाँच करतंय ‘ही’ जबरदस्त कार!

Photo Credit- Facebook/Morris Garages India

मुंबई | एमजी मोटार इंडिया कंपनीने भारतीय बाजारात २०१९ मध्ये श्रीगणेशा केला होता. त्यानंतर एका पेक्षा एक भारी गाड्या एमजीने बाजारात आणल्या आहेत. कंपनी अजून एक कार लॉन्च करणार आहे, अशी मार्केटमध्ये चर्चा सुरु असताना एमजीने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एमजी मोटर इंडियाने (MG Hector Plus 7 Seater) सात सीटर गाडी लवकरच बाजारात आणत असल्याची माहिती दिली आहे.

एमजीच्या मिड साइज एसयूव्हीला भारतात चांगली पसंदी मिळाली आहे. आता यामध्ये 7 सीटर व्हेरियंटचा पर्याय येणार  असून अधिक चांगले फिचर्स असणार आहेत. कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स आताच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडले आहे. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडले जाणार आहे. हे इंजिन 141Bhp आणि 250nm टार्क जनरेट करतं. या आधीच्या गाडीत एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं.

किंमत – भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख रुपये ते 18.68 लाख रुपयांपर्यंत आहे. CVT युनिट 2021 एमजी हेक्टरची किंमत 50 ते 60 हजारांनी कमी करण्याची शक्यता आहे. तर MG Hector Plus 7 Seater ची किंमत 6 मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी जास्त असल्याचा अंदाज आहे.

ताकदवार इंजिन- (MG Hector Plus 7 Seater) मध्ये तीन इंजिन पर्याय असण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सोबत आहे. तिसरे इंजिन 2.0 लीटर डिझेल इंजिन 168 बीचएपीची  पॉवर आणि 350 टॉर्क जनरेट करते.

फिचर्स- 6 सीटर प्रमाणेच 7 सीटर गाडीचे फिचर्स असतील. 6 सीटर मध्ये कारच्या पुढच्या बाजूला असलेली ग्रिल, प्रीमीयम एलईडी आणि क्रोम असेल. आयस्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टम असेल. स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, पॅनारोमिक सनरुफ, हिल होल्ड असिस्ट असे अनेक फिचर्स देण्यात आलेले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“पवारांसारख्या भ्रष्ट राजकारण्याच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण नको”

भाजप-मनसे युती होणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

साताऱ्यात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

विधानसभा अध्यक्षपद पुण्याला मिळणार?; ‘या’ नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या