Top News

तृतीयपंथीयांना निमलष्करी दलात घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी

नवी दिल्ली | लष्कर आणि निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना लष्कराच्या अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं विचारणा केली आहे. केंद्र सरकारनं देशातील निमलष्करी दलांना याविषयी भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं 1 जुलै रोजी यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. केंद्रीय निमलष्करी दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठीच्या परीक्षेच्या नियमात महिला, पुरुष व तृतीय पंथीयांचा समावेश करण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. त्यावर निमलष्करी दलांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं गृह मंत्रालयानं पुन्हा स्मरण करून दिलं आहे.

केंद्रीय लष्करी पोलीस दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नियमांमध्ये बदल करून महिला, पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर अद्याप पर्यंत सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी व सीआयएसएफकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही.

दरम्यान, या मुद्याचा विचार करून केंद्रीय गृह मंत्रालयाला 2 जुलैपर्यंत सकारात्मक अंतिम अभिप्राय द्यावा, असं मंत्रालयानं या पत्रात म्हटल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला; नितीन राऊतांकडे केली ‘ही’ मागणी

लॉकडाऊनमुळे पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर होणार!

बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादात अभिनेत्री तापसी पन्नूची उडी, म्हणाली…

‘या’ देशाने पबजी गेमवर घातली बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या